पु ल देशपांडे यांचे सुविचार – Pu La Deshpande Quotes Suvichar in marathi

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

पु ल देशपांडे यांचे सुविचार – Pu La Deshpande Quotes Suvichar in marathi

जगात काय बोलत आहात
ह्यापेक्षा कोण बोलत आहात
ह्याला जास्त महत्त्व आहे.


प्रयास हा
प्रतिभेचा प्राणवायू आहे


लग्नापुर्वी शी न लूक्ड सो … लुकडी!


परिस्थिति हा अश्रूंचा कारखाना आहे!.


माणसाचे “केस गेलेले” असले
तरी चालतील….
पण….
माणुस हा “गेलेली केस”
असु नये……


जाळायला काही नसलं की
पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.


माणसाला माणूस
जोडत गेलं पाहिजे…


आयुष्य फार सुंदर आहे…
ते फक्त चांगल्या विचारांनी
जगता आलं पाहिजे…


खर्च झाल्याचं दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास होतो.


प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात.
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणसं.
या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.


शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो.
बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.


माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर?
याची त्याला भिती वाटते.


Pu La Deshpande Quotes Suvichar in marathi – पु ल देशपांडे यांचे सर्वश्रेष्ठ सुविचार

बोलायला कुणीच नसणं
यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं
ही शोकांतिका जास्त भयाण.


खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.


रातकिडा कर्कश ओरडतो
यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो
कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.


आपलाही कोणाला
कंटाळा येऊ शकतो ही
जाणीव फार भयप्रद आहे.


सगळे वार परतवता येतील पण
अहंकारावर झालेला वार
परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही


कोणत्याही सुखाच्या क्षणी
आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.


रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.
पण तुळस वृंदावनातच राहते.
तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.


आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो,
त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.


झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही.
माझीच नव्हे, कुणाचीच नाही!
मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे?
शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय?
हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो.
आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते.
प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते.
विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!


शेवटी काय हो,
आपण पत्त्याच्या नावाचे धनी,
मजकुराचा मालक निराळाच.


“कुणीसं म्हटलयं – कसा मी ,? कसा मी ? कसा मी ?
जसा मी तसा मी असा मी असामी!…
खर सांगू का?
हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही.
मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय
तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे.
जगात काय म्हटलयं यापेक्षा
कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे
हे मला कळून चुकलंय.”


आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो.
उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा,
पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य,
चित्र, संगीत, नाट्य, शिल्प,
खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील,
पण कलेशी जमलेली मैत्री
तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment