Saha December Chappan Sali Lyrics in Marathi

Saha December Chappan Sali Lyrics in Marathi

६ डिसेंबर ५६ साली,
वेळ कशी ती हेरली

दृष्ट काळाने भीमरायाची
प्राणज्योत ती चोरली

बुद्धम सरणंम गच्छामी
धम्मंम सरणंम गच्छामी
संघम सरणंम गच्छामी

टपून बसला होता काळ
कसा महापुरुषावरती
देशोदेशी वार्ता पसरता
हादरून गेली हि धरती
काळजातील हंस हरपला
दर्याला आली भरती

सूर्य बुडाला अंधार झाला
म्हणून जनता हि झुरती
प्रगतीचे ते युगे दीनाची
गुपित मागे सारली

दृष्ट काळाने भीमरायाची
प्राण ज्योत ती चोरली

बुद्धम सरणंम गच्छामी
धम्मंम सरणंम गच्छामी
संघम सरणंम गच्छामी

देशहिताच्यासाठी लिहूनी
गेला कायद्याची गाथा
नमून फक्त आयुष्यामध्ये
बुद्धा चरणी तो माथा
हरपली आई हरपली माई
हरपली माता अन पिता
बाली देशाचा निघून गेला
कोण होईल तैसा आता
बैरीन रातीची ती मर्जी
दुरांधावर ती फिरली

दृष्ट काळाने भीमरायाची
प्राण ज्योत ती चोरली

बुद्धम सरणंम गच्छामी
धम्मंम सरणंम गच्छामी
संघम सरणंम गच्छामी

सात कोटीचा प्रकाश गेला
झाली जीवाची लाही
भिमापाठी या जगात आता
बाली उरलेलेला नाही
असे म्हणूनी दलित सारे
रडू लागे धाई धाई
चैत्यभूमीच्या ठिकाणी अश्रू
गंगेसवे नयनी वाही

असुन कोटी पिले तरी जी
भीममूर्ती ना तारली

दृष्ट काळाने भीमरायाची
प्राण ज्योत ती चोरली

बुद्धम सरणंम गच्छामी
धम्मंम सरणंम गच्छामी
संघम सरणंम गच्छामी

हर्ष कोपले सुख लोपले
बाळाचे अन आईचे

थोर उपकार देशावरती
आहे भीमाच्या शाहीचे
महामानवाने ते केले
कृत्य असे नबलाईचे
बुद्ध धम्माचे रोप लावूनी
फुल उमलली जाईचे
लढा देऊनी गुलामगिरीला
अंधश्रद्धा ती मारली

दृष्ट काळाने भीमरायाची
प्राण ज्योत ती चोरली

बुद्धम सरणंम गच्छामी
धम्मंम सरणंम गच्छामी
संघम सरणंम गच्छामी

शान जळता भारत भूची
चितेवरती हो पाहीली
पाहताक्षणी काशीनंदानी
आदरांजली वाहली
डबडबलेल्या अश्रूंनीही
महिमा त्यांची गाहिली
अमर झाली भीमाची कोर्ती
डोळ्याने मी पाहली

जाता जाता हृदयी आमच्या
मूर्ती बुद्धाची कोरली

दृष्ट काळाने भीमरायाची
प्राण ज्योत ती चोरली

६ डिसेंबर ५६ साली,
वेळ कशी ती हेरली

दृष्ट काळाने भीमरायाची
प्राणज्योत ती चोरली

बुद्धम सरणंम गच्छामी
धम्मंम सरणंम गच्छामी
संघम सरणंम गच्छामी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *