विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स – Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Marathi Lyrics

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स – Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,
विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,
विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,
विठ्ठला मायबापा

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स मराठी
Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics marathi

Leave a comment

Your email address will not be published.