अरे कृष्णा अरे कान्हा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

अरे कृष्णा अरे कान्हा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना

आले संत घरीं तरी काय बोलुन शिणवावें?
उंस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गांवचा पाटील झाला म्हणून काय गांवच बुडवावे?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना

देव अंगी आला म्हणून काय भलतेंच बोलावें
चंदन शीतळ झाला म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्‍त्रें केलीं म्हणून काय जगच नाडावें
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना

परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच ओढावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरींच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना

सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशीं दावावा
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी ह्मणे हरी हा गुप्तची ओळखावा
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना

Leave a comment

Your email address will not be published.