पुन्हा न येईल वेळ Lyrics in Marathi

अरे मोहना
वरचेवर का जमतो ऐसा मी
पुन्हा न येईल वेळ कधी ही
पुन्हा न येईल वेळ सख्या ही
पुन्हा न येईल वेळ

आज वाहते पाणी झुळझुळ
घे पिऊनी भरभरुनी ओंजळ
परतुनी जेव्हा केव्हा येशिल
अरे कदाचित रिता कोरडा
आढळेल ओहोळ

सूर लागला खिळले लोचन
जुळल्या तारा उचंबळे मन
फुले चांदणे पसरी मोहन
अरे मोहना, वरचेवर का
जमतो ऐसा मेळ

अधीर व्याकुळ श्वास विलंबित
अधर पाकळ्या झाल्या विगलित
आतुरतेने काया कंपित
नको बुजू रे घे सावरुनी
ही झुकलेली वेल


गीत पी. सावळाराम
संगीत पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर लता मंगेशकर
चित्रपट भाव तेथे देव
गीत प्रकार चित्रगीत

Leave a comment

Your email address will not be published.