विसरलास तू सहज मला
विसरू कशी रे प्रिया तुला
तोडिलेस तू अपुले नाते
कधी न फिरकसी माझ्या येथे
तुझी आठवण करिता येते
कशी आडवू मी तिजला?
ती वेडी वेळ तिन्हीसांजेची
उरी शिरशिरी मनात भीती
लालस बोटे श्यामल हाती
धीट लाजरा प्रसंग पहिला
गीत | – | ग. दि. माडगूळकर |
संगीत | – | पुरुषोत्तम सोळांकुरकर |
स्वर | – | माणिक वर्मा |
गीत प्रकार | – | भावगीत |