सजल श्याम घन गर्जत Lyrics in Marathi

सजल श्याम घन गर्जत आले
बरसत आज तुषार
आता जीवनमय संसार

नाचवीत तळहाती ज्वाला
वणव्याच्या कमरेस मेखला
बांधुनिया हा ग्रीष्म कृतांतापरी करी संहार

लोपुन गेले वसंतवैभव
सुगंध विरले नुरले मार्दव
मंजुळ कोकिळकूजन सरले होत सुने सहकार

जळक्या पिवळ्या माळावरती
पुलकित गंधित झाली माती
बिजें तृणांची गर्भामधुनी देत नवा हुंकार

रित्या नद्या सुकलेले निर्झर
भकास राने उदास डोंगर
कृतज्ञतेने बघती श्रवती मेघांचे ललकार


गीत कुसुमाग्रज
संगीत प्रभाकर पंडित
स्वर प्रभाकर कारेकर
गीत प्रकार भावगीत
    टीप
• काव्य रचना- १९५०.

Leave a comment

Your email address will not be published.