विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥ होतो नामाचा गजर । दिंड्या पताकांचा भार ॥२॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥ हरि कीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

पंढरीचे सुख नाहीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

पंढरीचे सुख नाहीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥ सकळ संतांचा मुकुटमणी देखा । पुंडलिक सखा आहे जेथें ॥३॥ चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

धांव घाली विठू आतां – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

धांव घाली विठू आतां – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi धांव घाली विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥ विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला । शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला ॥२॥ जोडुनियां कर चोखा विनवितो देवा । बोलिला उत्तरीं परि राग नसावा ॥४॥

जोहार मायबाप जोहार – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

जोहार मायबाप जोहार – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥ बहु भुकेला झालों । तुमच्या उष्ट्यासाठीं आलों ॥२॥ चोखा ह्मणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठीं ॥३॥

आह्मां नकळे ज्ञान – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

आह्मां नकळे ज्ञान – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi आह्मां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आह्मां ॥१॥ आगमाची आढी निगमाचा भेद । शास्‍त्रांचा संवाद न कळे आह्मां ॥२॥ योग याग तप अष्टांग साधन । नकळेची दान व्रत तप ॥३॥ चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम … Read more

निर्गुणाचे भेटी आलो – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi

निर्गुणाचे भेटी आलो – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे । तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥ मज रूप नाहीं, नांव सांगू काई । झाला बाई काई बोलूं नये ॥२॥ बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥ ह्मणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली … Read more

निर्गुणाचा संग धरिला जो- Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi

निर्गुणाचा संग धरिला जो- Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशोधडी आपणियासी ॥१॥ अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें । एकलें सांडिलें निरंजनीं ॥२॥ एकत्व पाहतां अवघें लटिकें । जें पाहें तितुकें रूप तुझें ॥३॥ ह्मणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा तुह्मा आह्मा ठावा कैंचे काय ॥४॥

केशवाचे भेटी लागलेंसे – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi

केशवाचे भेटी लागलेंसे – Sant Gora Kumbhar अभंगवाणी Lyrics in Marathi केशवाचे भेटी लागलेंसे पिसें विसरलों कैसें देहभान झाली झडपणी झाली झडपणी संचरलें मनीं आधीं रूप ना लिंपेची कर्मि ना लिंपेची धर्मी ना लिंपे जडधर्मी मुक्त पाप ह्मणे गोरा कुंभार सहजी जीवन्मुक्त सुखरूप अद्वैत झाले बाप

या विठूचा गजर हरिनामाचा – Sant Keshavdas अभंगवाणी Lyrics in Marathi

या विठूचा गजर हरिनामाचा – Sant Keshavdas अभंगवाणी Lyrics in Marathi या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला । या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला ॥१॥ कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण । नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥ उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्गुरूजवळी । प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥ पंचतत्त्वांची गोफण, क्रोध … Read more

पतित तूं पावना – Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi

पतित तूं पावना – Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥ तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥ याती शुद्ध नाहीं भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥ मुखीं नाम नाहीं । कान्होपात्रा शरण पायीं ॥४॥