येथोनि आनंदु रे – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

येथोनि आनंदु रे – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi येथोनि आनंदु रे । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥ महाराजाचे राउळीं । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥ लक्ष्मी चतुर्भुज जाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥ एका जनार्दनीं नाम । पाहतां मिळे आत्माराम ॥४॥

या पंढरीचें सुख – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

या पंढरीचें सुख – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi या पंढरीचें सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥ ह्मणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥ जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं । करी वोवाळणी शरीराची ॥३॥

माझ्या मना लागो छंद- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

माझ्या मना लागो छंद- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi माझ्या मना लागो छंद । गोविंद, नित्य गोविंद ॥१॥ तेणें देह ब्रह्मरूप गोविंद । निरसेल नामरूप, गोविंद ॥२॥ तुटेल सकळ उपाधि । निरसेल आधि-व्याधी, गोविंद ॥३॥ गोविंद हा जनीं-वनीं । ह्मणे एका जनार्दनीं ॥४॥

माझें माहेर पंढरी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

माझें माहेर पंढरी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi माझें माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥ पुंडलिक आहे बंधू । त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥ माझी बहीण चंद्रभागा । करीतसे पाप भंगा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । करी माहेरची आठवण ॥५॥

भाव तोंचि देव- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

भाव तोंचि देव- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi भाव तोंचि देव भाव तोंचि देव । ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥ भाव भक्ति फळे भावें देव मिळे । निजभावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥ भावचि कारण भावचि कारण । यापरतें साधन नाहीं नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं भावाच्या आवडी । मनोरथ कोडी पुरती तेथें ॥४॥

नको वाजवू श्रीहरी मुरली – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

नको वाजवू श्रीहरी मुरली – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ जल स्थिरावली घागर घेऊन पाणियासी जाता डोईवर घागर पाझरली एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गौळण घाबरली

देवासी तो पुरे एक – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

देवासी तो पुरे एक – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥ मनापासूनियां करितां कीर्तन । आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥ रामकृष्णहरि उच्चार सर्वदा । कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥ एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास । सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥

दादला नको ग बाई – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

दादला नको ग बाई – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi बया बया बया ! काय झालं बया? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई ! मोडकंच घर, तुटकंच छप्पर पन र्‍हायाला जागा नाही मला दादला नको ग बाई ! फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी पन शिवायला दोरा न्हाई मला दादला नको ग बाई … Read more

जया म्हणती नीचवर्ण- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

जया म्हणती नीचवर्ण- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi जया म्हणती नीचवर्ण । स्‍त्रीशुद्रादी हीनजन ॥१॥ सर्वांभूतीं देव वसे । नीचा ठायीं काय नसे ॥२॥ नीच कोठोनि जन्मला । पंचभूतां वेगळा जाला ॥३॥ तया नाहीं कां जनन । सवेंचि होत पतन ॥४॥ नीच म्हणोनि काय भुलीं । एका जनार्दनीं देखिली ॥५॥

गुरु परमात्मा परेशु – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

गुरु परमात्मा परेशु – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥ देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥ एका जनार्दनीं गुरुदेव । येथें नाहीं बा संशय ॥३॥