खांद्यावरी घोंगडी हातामध्ये – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

खांद्यावरी घोंगडी हातामध्ये – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी । घेउनिया चारीतसे धेनु सांवळा ॥१॥ राधे तुझा मुकुंद मुरारी । वाजवि वेणू नानापरि ॥२॥ सकळ तीर्थें ज्याच्या चरणांवरी लोळती । तो ह्मणे राधिकेसी करीन मी तुझी वेणीफणी ॥३॥ एका जनार्दनीं रचिलें रासमंडळ । जिकडे पाहें तिकडे अवघें ब्रह्म कोंदलें ॥४॥

कुणीतरी सांगा गे – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

कुणीतरी सांगा गे – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय ॥१॥ हाती घेउनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । होतें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥२॥ माथां शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला ह्मणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥३॥ एका जनार्दनीं … Read more

काया ही पंढरी आत्मा हा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

काया ही पंढरी आत्मा हा – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥ भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥ दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥ ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥ दश इंद्रियांचा एक मेळ केला … Read more

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥ कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥ कानडा विठ्ठल रूपे सांवळा । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥ कानडा विठ्ठल चंद्रभागें तटीं । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥ कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या … Read more

कसा मला टाकुनी गेला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

कसा मला टाकुनी गेला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi कसा मला टाकुनी गेला राम ॥१॥ रामाविण जीव व्याकुळ होतो । सुचत नाहीं काम ॥२॥ रामाविण मज चैन पडेना । नाहीं जिवासी आराम ॥३॥ एका जनार्दनीं पाहुनी डोळा । स्वरूप तुझें घनश्याम ॥४॥

कशी जांवू मी वृंदावना- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

कशी जांवू मी वृंदावना- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi कशी जाऊं मी वृंदावना । मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥ पैलतिरीं हरी वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥२॥ कांसे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥३॥ काय करूं बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥४॥ नंदाच्या हरीनें कौतुक केलें । जाणे अंतरींच्या … Read more

ऐक ऐक सखये बाई- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

ऐक ऐक सखये बाई- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगूं काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई ॥१॥ देवकीनें वाईला यशोदेनें पाळिला । पांडवांचा बंदीजन होऊनियां राहिला ॥२॥ ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचें निजधन । चोरी केली म्हणऊन उखळासी बंधन ॥३॥ सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूळपाणि … Read more

आवडीनें भावें हरिनाम – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

आवडीनें भावें हरिनाम – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ नको खेद धरूं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥ सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥ जैसी स्थिति आहे तैशापरी राहें । कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥ एका जनार्दनीं … Read more

आह्मां नादीं विठ्ठलु – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

आह्मां नादीं विठ्ठलु – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi आह्मां नादीं विठ्ठलु आह्मां छंदी विठ्ठलु हृत्पदीं विठ्ठलु मिळतसे ॥१॥ आह्मां धातु विठ्ठल मातु विठ्ठलु गातु विठ्ठलु आनंदें ॥२॥ आह्मां राग विठ्ठलु रंग विठ्ठलु संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥ आह्मां ताल विठ्ठलु मेळ विठ्ठलु कल्लोळ विठ्ठलु कीर्तनें ॥४॥ आह्मां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु वक्ता विठ्ठलु वदनीं … Read more

असा कसा देवाचा देव बाई – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

असा कसा देवाचा देव बाई – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥ शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥ वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधूसंतांशी झगडा ॥३॥ एका जनार्दनीं भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥