Kadhi Lagel Re Vedya Tula Godi Abhangachi Lyrics

Kadhi Lagel Re Vedya Tula Godi Abhangachi Lyrics तुझा ना भरोसा, आ तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूनमाती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तू लालसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल, कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी … Read more

Yuge Atthavis Lyrics In Marathi

Yuge Atthavis Lyrics In Marathi युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥ देव सुरवर नित्य … Read more

देहुडा चरण वाजवितो Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi Abhang

देहुडा चरण वाजवितो Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi Abhang Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi देहुडा चरण वाजवितो वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा देखिलागे माय यमुनेचें तीरीं । हात खांद्यावरी राधिकेच्या गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी । मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशीराजा Dehuda Charani Vajavito Lyrics in English … Read more

देह शुद्ध करुनी – Sant Janardan Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi

देह शुद्ध करुनी – Sant Janardan Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi देह शुद्ध करुनी भजनीं भजावे । आणिकाचें नाठवावें दोषगुण ॥१॥ साधनें समाधी नको पां उपाधि । सर्व समबुद्धी करी मन ॥२॥ ह्मणे जनार्दन घेई अनुताप । सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥

सुखाचें हें नाम आवडीनें – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुखाचें हें नाम आवडीनें – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥ संसार सुखाचा होईल निर्धार नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥ कामक्रोधांचें न चलेचि कांहीं । आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥ आवडी धरोनी वाचें ह्मणे हरिहरि । ह्मणतसे महारी चोखियाची ॥४॥

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलिकापाठीं उभें ठाकें ॥१॥ साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥ कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥ चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥ तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली । जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥ संसारी आसक्त माया-मोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥ चोखा ह्मणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥

विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥ होतो नामाचा गजर । दिंड्या पताकांचा भार ॥२॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥ हरि कीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

पंढरीचे सुख नाहीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

पंढरीचे सुख नाहीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥ सकळ संतांचा मुकुटमणी देखा । पुंडलिक सखा आहे जेथें ॥३॥ चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

धांव घाली विठू आतां – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi

धांव घाली विठू आतां – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi धांव घाली विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥ विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला । शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला ॥२॥ जोडुनियां कर चोखा विनवितो देवा । बोलिला उत्तरीं परि राग नसावा ॥४॥