Tarun Aahe Ratra Ajuni Lyrics in Marathi – तरुण आहे रात्र

Tarun Aahe Ratra Ajuni Lyrics in Marathi – तरुण आहे रात्र

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे हाय ! तू विझलास का रे

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे… आणि तू मिटलास का रे

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे

उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा
तू किनाऱ्यासारखा पण कोरडा उरलास का रे

ओठ अजुनी बंद का रे श्वास ही मधुमंद का रे
बोल, शेजेच्या फुलांवर तू असा रुसलास का रे

Leave a comment

Your email address will not be published.