उगवली शुक्राची चांदणी Ugavali Shukrachi Chandani lyrics in Marathi

उगवली शुक्राची चांदणी Ugavali Shukrachi Chandani lyrics in Marathi

Ugavali Shukrachi Chandani lyrics in Marathi

अडवू नका मज सोडा आता,
पुरं झालं ना धनी
उगवली शुक्राची चांदणी

*हिचं ऐका पाव्हणं,
काय हे वागणं
शोभतंय्‌ व्हय्‌ तुम्हाला ?

हिचा हात धरून,
गालामध्ये हसणं
शोभतंय्‌ का तुम्हाला ?

जरा लाज धरा हो येता-जाता
पाहिल्‌ ना हो कुणी*

उगवली शुक्राची चांदणी

निरव शांतता अवतीभवती,
रातकिडं हे किरकिर करती
भिरभिर उडती वर पाकोळ्या
धडधड होते मनी
उगवली शुक्राची चांदणी !

लवलव करिती हिरवी पाती,
चमचमणार्‍या चांदणराती
वार्‍यावरती गंध दरवळे
केतकीच्या या बनी
उगवली शुक्राची चांदणी !

Leave a comment

Your email address will not be published.